आज ७ वर्ष पूर्ण झाली.२८ वर्षानंतर जिंकलेल्या जगज्जेतेपदाला.७ क्रमांकाच्या जर्सी असलेल्या माणसाला हा मानाचा तुरा स्वतःच्या शिरपेचात रोवून घेताना पाहून अंगावर काटा आला होता,ती आठवण आजही काटा आणते.
ह्याची सुरवात अशाच एका काळ्या "७" ने झाली होती.२००७ च्या वर्ल्ड कप मध्ये क्रिकेट जगतात मिसुरडही न फुटलेला संघ बांगलादेशने लाजिरवाणा पराभव केला होता.
ह्याच शल्य घेऊन सगळ्याच तमाम खेळाडूंनी क्रिकेट च्या नवीन अपत्याच्या जागतिक स्पर्धेत खेळण्यास नकार दिला.
आणि मग सेनापती एका माणसाला केलं.."महेंद्रसिंग धोनी"..
आणि हा सेनापती भारतीय ,जागतिक क्रिकेट चा नेपलिन बोनापार्ट ठरेल हे कुणाच्या स्वप्नवत नसेल तेव्हा.
वर्ष २००७.गावातील लाईट गेलेली.जीव वर खाली होत होता.हनुमाच्या पारावर सगळे जमलेले.इन्व्हर्टेट बदल चर्चा सुरु होती आणि रेडिओ भारतीय गोलंदाजांच्या नावाने रडत होता.मिस्बाह हरभजनला झोड झोडत होता.आणि एक चाल आणि प्रिय शत्रूस परत एकदा शिताफीने मात.जोगिंदर साहेबांच्या खांद्यावर विश्वासाने बंदूक ठेवून धोनी भाऊंनी २००७ चा पहिलावहिला विश्वचषक जिंकला.२००७ ने शेवटी शेवटी का होईना भरभरून दिल.
तिथून खरंच एका पर्वाला सुरवात झाली.पंटर च्या संघाला त्यांच्या मातीत जाऊन CB सिरीज जिंकली.अंतिम सामने २-० ने जिंकून.भारत कसोटी मध्ये अव्वल क्रमांकावर पोहोचला.त्याच पंटरच्या संघाला ४-० ने कसोटी मालिका हरवून नळाखाली अंघोळ करायला लावली.
अशा कितीतरी मालिका आपला संघ जिंकत होता आणि हा सेनापती अश्वारूढ होऊन जगात दुमदुमत होता.
"माझ्याआधी संघ" ह्या एका वृत्तीने भारताला खूप चांगले फलंदाज आणि गोलंदाज दिले.
जेष्ठ असले ,कितीही चांगले फलंदाज असले तरी क्षेत्ररक्षणात कमी पडून चालणार नाही.तुम्हाला बाहेर बसावं लागेल.आणि ह्याचा परिणाम म्हणून कित्येक सामने आपण क्षेत्ररक्षणाच्या जोरावर जिंकले.
ओपनर होता येत असताना संघाला माझी गरज खालच्या क्रमांकावर खेळण्याची आहे म्हणून मी खाली खेळेन आणि तिथेच आम्हाला आमचा "THE Finisher -धोनी" मिळाला.
आणि ह्याच विश्वासामुळे धवन,रोहित.आणि कोहली सारखे दर्जेदार आणि गुणवान खेळाडू देशाला मिळाले.
सगळेच कर्णधार कमी अधिक प्रमाणात हेकेखोर असतात.हरभजन आणि कुंबळे साठी भांडणारा आपला दादा आठवा.आपल्या हक्काच्या खेळाडू साठी असं करावं लागत.आणि हाच विश्वास सार्थ करून दाखवला तो अश्विन आणि जडेजा ने.
धोनी ने किती लांबचा विचार केला होता २००८ मधेच ते आपल्याला वरवरून नाही कळणार.जेव्हा आपण दुसऱ्या संघाना पाहू तेव्हा कळेल.
अर्जुन रणतुंगा एकदा म्हणाला होता कि संगकारा आणि जयवर्धने ह्यांनी संघ बांधणी साठी काही केलंच नाही.कमी अधिक प्रमाणात असं बऱ्याच संघांसोबत झालं आहे.
वेस्ट इंडिज श्रीलंका,ऑस्ट्रेलिया.काही खेळाडूंच्या जाण्याने पूर्ण संघ कोलमडल्यात जमा झाला.
सचिन,द्रविड,कुंबळे,गांगुली,सेहवाग ह्यांनी इच्छेने मैदान सोडलं खरं आणि त्यांची उणीव भासते सुद्धा पण संघाच्या कामगिरीवर परिणाम नाही झाला.आणि कसोटी मध्ये सुद्धा धोनी गेल्याने उणीव भासते,कधी Stumping miss केली "साहू" ने तर राग येतो पण संघाच्या कामगिरीवर परिणाम नाही झाला.
हे धोनीचं कर्णधार म्हणून मोठं यश आहे असं मला वाटत.
आलटूनपालटून सेहवाग,सचिन,गंभीर ला खेळवण्यामागे कारण एकच होत,ह्यांच्यासोबत जास्तीत जास्त नवोदितांना खेळण्याची संधी मिळावी.
पण उरात एक शल्य होत ते म्हणजे २००७ चा पराभव.
२ एप्रिल २०११ इज़द्ल आणि हा दिवस सुवर्ण अक्षराने इतिहासात लिहिला गेला.अंतिम सामन्यात षटकार मारून देशाला जिंकून देणं फार गर्वाचा क्षण आहे.पण गंभीर ,युवराज आणि सगळ्या संघाचं तितकाच अभिनंदन करावं लागेल.योगदान सगळ्याच खेळाडूंचं आहे.
असाच २०१९ चा विश्वचषक आपण धोनीला निरोप देताना जिंकावा अशी ह्या दिनी अशा व्यक्त करतो.