फादर्स डे येऊन गेला आता तो आपण साजरा करावा की नाही हा वादाचा विषय आहे पण संसाराचा भार वाहणाऱ्या वडिलांविषयी कृतज्ञतेचा एक तरी दिवस असावा हे मात्र खरे. समुद्र आणि वडिल हे सारखेच वाटतात. वरून कितीही शांत असले तरी आतमधे काय कालवाकालव सुरू असते ते त्यांनाच माहीती. सगळ काही आत ठेवून स्थितप्रज्ञतेने वागणे हे फार काही सोपे काम नाही .
फक्त सागराशी बोलायाला सगळे येतात वडिलांशी शेअर करणे पिढीनुसार बदलत गेले तरी ते तितके सराईत नाही .
किनाऱ्यावर सगळे येतात. दुःख झाले म्हणून येणारे , तर झालेले दुःख विसरणारे किंवा आठवून त्यावर रडत बसणारे , आनंद साजरा करणारे , सुखाची वाटणी करणारे, काळाचा वेध घेणारे. सगळे येतात आणि समुद्र सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतो . फारच पटले नाही तर एखादी जोरात लाट आणून धडकतो ते तेवढेच.
“सागराने नाविका मनी संकट मोठे पेरले होडीस एका दशदिशांनी घेरले.”
समुद्र भीती पेक्षा नाविकाला परिस्थिती साठी तयार करतो असेच वाटते मला ह्या कवितेतून. जसे वडिल नको वाटणारी छोटी छोटी कामे सांगून आपल्याला मोठे करत असतात.
काही सहवास असे असताता जे जाणवत नाहीत पण परिणाम कारक असतात.
कमी सहवास लाभलेल्यांच किंवा सहवासच लाभला नाही त्यांच दुःख हे कुणीच समजू शकत नाही. त्यांनी कधीतरी समुद्राशी बोलावं बाबाला आठवून बाकी लोकांनी दोघांशी बोलावं.