घुसमट...घुसमट...
काय असते हि घुसमट?का असते?
मला नेहमी असं वाटत की हिला आपण नेहमी अपयशाच्या आणि नैराश्याच्या कुशीमध्येच झुलताना का पाहतो?
आतल्या आत श्वास चालू असताना गुदमरण असत ते म्हणजेच ही घुसमट!!
ह्यामुळेच माणूस निराश होतो.खचतो.आत्मविश्वास ढळतो आणि मग आत्मसन्मान गमावतो.स्वतःच्या नजरेत पडतो.आरशातले स्वतःचे प्रतिबिंब ढगाळलेल्या आभाळासारखे भासत असते. स्वतःचे शब्द जड होऊ लागतात आणि विचार मेंदूला काट्यासारखेच टोचत असतात...
इतकं सगळं होत असत,ह्या घुसमटीमुळे!
ह्या..ह्या..ह्या घुसमटीमुळे!!!
विचारांच्या सुसाट सुटलेल्या काहुरामध्ये पण ना एक मंद झुळूक असते.हीच झुळूक आपल्याला अपेक्षेच्या उंच झोपाळ्यावरून घुसमटीच्या गुहेत नेऊन आणेल.तिथे तीला पाहता येईल.एक डोळा बंद करून.दोन्ही डोळ्यांनी किंवा दोन्ही डोळे बंद करून सुद्धा.तिला मेंदूंनी ऐकलं आणि कानांनी तिला समजून घेतलं तरी चालेल.
ह्या गुदमरण्याला आणि घुसमटीला थोडं मोकळं सोडलं.थोडं सैल सोडलं तर..
नवल वाटेल पण तिच्याशी मैत्री करून तिला श्वास घेऊ दिला तर आपल्याला आपल्या मनाचं अंतरंग खूप स्वच्छ आणि पारदर्शी दिसेल.स्वतःलाओळखायला लागू.स्वतःला काय हवं नको ते कळेल.. माझ्यातला मला मी गवसेन!!
निरागस मन,आपल्याला ओळखणार मन मुक्त होईल.बिचार ते मन आणि बिचारे आपण.
कितीतरी गोष्टीचा अनावश्यक ताण असतो ना आपल्यावर,कधीतर उगाच जड जड वाटायला लागत.
एकदा तरी आपण प्रयन्त करू.भीतीने म्हणा किंवा कशानेही म्हणा,आपण घुसमटीला दूर लोटतो आणि तिचाच विचार करू लागतो.
ह्याच विचारांचा मग फुगवटा झाला आहे.तोच आपल्याला डोईजड होतो आहे.
माझ्यामधेही आहे एक घुसमट,"शब्दांना मूर्त रूप देण्याची"..पण कळत नव्हतं कस?आता काहीच लिहिता येणार नाही असं वाटायचं ..म्हणलं देऊ वेळ.श्वास घेऊ देऊ.
हे सगळं ना घराला लागलेल्या जळमटासारखं असत.उंचीवर आहे म्हणून टाळाटाळ करणं आहे. बस्स...बाकी काही नाही..
एकदा प्रयन्त करू..
देऊ थोडा वेळ..
घेऊ देऊ घुसमटीला श्वास..श्वास घुसमटीला..

अप्रतिम .. घुसमट ...!!!
ReplyDelete