Monday 21 January 2019

गादी मन

गादीमधला कापूस विरळ झाला ,किंवा पाणी वगैरे सतत पडल की अस खडे तयार होतात .समतल अस रहात नाही.झोपताना फार त्रास होतो.
मान आवटाळणे,पाठदुखी होते मग.
उपाय एकच गादी बदला अथवा गादीमधला कापूस बदला.
दोन्ही शक्य नसेल तर सरळ चटई ,सतरंजीचा अवलंब करा.
गादी आठवली कारण आपल ही थोडस तसच प्रकरण आहे.विचार विरळ झाले किंवा निश्चय ढळला की मग हळूहळू न्यूनगंड अन नैराश्येचे खडे बोचू लागतात आणि आपण आळसाच्या आडगांवर ,कारणांच्या समतल भागावर आकृष्ठ होऊन गाडी ढकलत ठेवतो.
नको हे अस.करूया थोडासा बदल.
देऊ ताणून जातील पाय जितके जायच लांब अन मग स्थिर होऊन झोपेच अंथरूण अन विचाराच स्वत:शी असलेल समीकरण समतल करून घेऊ.
कापूस भरूया.भरत राहू.
शांत झोप अन स्थिर मन हवच ना !!!
(गादी बदलतो शनिवारी मी 😬😜)
                               -संजीत चौधरी

No comments:

Post a Comment

खूप आभारी आहे.🙏🏼

एक सकाळ

गाढ झोपेतून जागा होऊन ताडकन उठून बसलो की लगेच चक्कर आली. माहीती होते जाग आली की लगेच असे ताडकन न उठता एका अडंगावर येऊन उठायचे असते. विचारच इ...