Saturday 9 March 2019

पुष्पक विमान


आजोबांच्या थरथरत्या हातांना धरून घेऊन जा पुष्पक विमान पहायला.
तुमच्या सर्वात पहिल्या मैत्रीची सुरवात आठवेल.
तो पहिला मित्र आठवेल जो आता बाजूला बसलाय ज्याने निरपेक्ष मैत्री काय असते नकळत शिकवल.
लाड पुरवणार हक्काच माणूस म्हणजे आजोबा.
त्यांना तुमच्या गुणांच,शाळेच्या प्रगतीच,भविष्याच्या डोलार्याच ओझं नसत.तो माणूस तुमच्या भावविश्वात येऊन जगत असतो.स्वच्छंदी.
तुम्ही एकदम आजोबा म्हणताना सरळ नावाने जरी हाक मारली तर तुम्हाला अहो जातो ने प्रतिसाद देणारा हा आपल्या आयुष्यातला अवलिया त्याच्या आयुष्यात नातवाला सर्वस्व सहजपणे अर्पण करतो.
आजीच सोवळ हा आजोबा नातवासाठी कस फाट्यावर मारतो हे मी फार जवळून पाहीलय ,अनुभवलय.
आजोबा आपली खरच सुरवात असतात आणि त्यांचा आपण शेवट असतो का ह्यापेक्षा नातवाच्या आगमनापासून फक्त नातूच श्वास असतो.
श्वास चित्रपटानंतर आजोबा आणि नातवाच्या रेशमासारख्या नात्यावर बोलणार्या मोजक्या चित्रपटापैकी पुष्पक विमान हा एक.
जरूर पहा!!!!
आजोबाच वयं वाढल ते काही गोष्टी विसरत जातात पण नातू तसाच त्यांच्या आयुष्यपटावर खेळत असतो नव्हे ते खेळवत असतात.
म्हणून चटका लावून गेल तरी नातू त्यांचा नकळतपणे शेवट असतोच आणि ते प्रत्यक्ष अनुभवण एक नकोशी जखम ..
आबासाठी..

प्रवास

किशोरची गाणी होती सोबत
वाट मागे सरत होती....
ऑटोच्या प्रवासात ती सोबत होती.
ठिकाण दर  ठिकाण ऑटो होता थांबत,
आणि मग लागलेल्या  दिव्यात
ती दिसत मला होती...
प्रवास सुरु होत असे  मग
आणि दिवे विझवी चालक तो..
गाण्यात गुंग मी ; तिला परत
पाहायला उतावीळ  मी जो..
कधी लागे "कभी कभी",
तर कधी "तुम बिन"..
उशिरा सोडलेल्या मॅनेजर चे
चुकवू  कसे मी ऋण..
लागले मधेच
"तेरा मुझसे है पेहले का नाता कोई"..
आणि आमच्यातला शेजारी असून
एकांत झाला जड डोई..
गर्दी कमी होत होती..
वाढत होती..
माणसं होती उतरत..
काही नवे लोक होती बसत ...
धडपड पाहून चालकाची,
 "कळी" ती हसली खुदकुन..
आणि मी पहिले त्या
बोलक्या डोळ्यात चमकून....
गर्दी होणारच आहे असच बसावं लागेल आपल्याला
म्हणाली ती हसत "मला"..
उगाच वाटलं मला ,
"आवडला अबोल सहवास माझा तिला"...
अशीच  गाणी बदलत होती ...
आणि तसच ती दूरवर,
 सोबत माझ्या येत होती..
उडणारे केस माझ्या चक्षुंवर स्पर्श करत होते..
काहीतरी मला जणू  खुणावत होते..
मधेच गाणी  झाली बंद
आणि हळूच उतरली ती ..
वाटलं तोडली जणू
कळी कुणीतरी ती..
लागलं गाणं परत
"कोई हमदम ना राहा" ..
आणि दिवा परत लागला,
बसलं "कुणीतरी" परत बाजूला..
आणि किशोरचा सूर परत.
"ये शाम मस्तानी "चा  लागला..
मग परत प्रवास झाला सुरु ..
बोलका एकांत परत सुरु...    
  (प्रवास माझाच आहे बरं का!!!)

चवदार “कूक”



श्रीकांत निळेवाड चा मॅसेज वाचून मी आॅफीस मधे असून किंचाळलो “Yes” म्हणून.
सगळे पहात होते हे सांगायला नकोच.
पण मग वाटल किती नालायकपणा आहे हा .
मॅसेज होता कुक च्या रिटायरमेंटचा.
मला सचिन निवृत्त व्हाव वाटत नव्हता ह्याच कारण हाही माणूस होता.
त्याच खेळणं,त्याचा तो भन्नाट फाॅर्म पाहून सचिन देवाच्या रेकाॅर्डला सुरूंग लागणार हे नक्की वाटत होत .
जितका दिसायला देखणा तितकाच खेळण्यात जबरदस्त.त्याचा ड्राईव्ह माझा फेव्हरेट.
कुक म्हणजे इंग्लिश क्रिकेटचा विशेषत: कसोटी क्रिकेट चा मुकुट मनी .
मला कधीच सोयरसुतक नव्हत जिंकल कोण ?
चिंता होती ती ह्याच्या शतकाची जे होऊ नाही वाटत
(विराट बाबतही वाटत )
फलंदाजी करताना जोडीदार बदलला की खेळावर परिणाम होतो.तुम्हाला तुमची पध्दत थोडीशी बदलावी लागते ,कुक ने तब्बल सात खेळाडूंसोबत डावाची सुरवात केली आहे.ट्रेस्कोथिक पासून ते जेनकिंग पर्यंत .आता पर्याय कुक साठी शोधावा लागणार ह्याची खंत आहे.
कुक ने इंग्लिश क्रिकेट ला भरभरून दिल आहे आणि क्रिकेट ला पण..
तुला खूप शुभेच्छा.
मी एवढच म्हणेन तू परत ये पण शतक करू नकोस.
We will miss that top class player and beyond that gentleman player .
Hats off to you Alester Cook..
🙌🏻🙌🏻
           

हा पेन


आज किती दिवसांनी विकत घेतलाय.
ह्या पेनची आणि माझी आठवण फार जूनी आहे.अगदी शाळेपासूनची.
मुल कमी गुण मिळाले म्हणून मार खायचे आणि मी अक्षरावरून मार खायचो.
कधीतरी येणारी त्सुनामी बाबांच्या अंगात यायची आणि मला भा रा तांबे,विंदा ह्यांना लिहून काढावे लागे.
कुसुमावतींचा “दमडी” धडा तर पाठ झाला होता.
मला उदाहरण देत असत हीच अक्षर बघ ,तिच बघ ..सगळी मुलींचेच..
माझी सगळी मित्र सारखीच.
एका मैत्रिणीच अक्षर चांगल होत,म्हणल तु लिहीते तस लिहावं ,तोच पेन घ्यावा.तेव्हा कुठे माझा ह्या पेनशी संबंध आला.
मग जितक्या लोकांची अक्षर चांगली आहेत तसच पेन धरून लिहायच यत्न केला.
अंगठा आणि पहिल बोट,अंगठा ,पहिल बोट अन मधल बोट अस काहीस त्रिकूट मग पेन अंगठा आणि मागे मधल बोट आधाराला..
काही झाल नाही.
अक्षर आणि मी दोघंही तसेच राहीलो.आळशी.
हळू लिहील तर चांगल येत नाहीतर काही एक येणार नाही वाचतां.
(टीप:बाबांच अक्षर चांगल असेल तर फार मार बसतो.)
                 -आळशी संजीत

नवरात्रातील कीर्तनांचे सार

 माझ्या गावात मुदखेडमधे श्री कालेजी देवी (मूळ स्थान माहूर) मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव खूप उत्साहात साजरा करतात. कीर्तन , भजन आणि असे असंख्...